शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
चौके (प्रतिनिधी) : शिक्षण प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ” शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या” वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे, येथील प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची महत्वाची गरज ओळखून शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्था आणिलेखक/दिग्दर्शक/अभिनेता श्रमेश बेटकर (सोनी मराठी महाराष्ट्राची हास्य जत्रा,चित्रपट लास्ट स्टॉप खांदा) यांच्या माध्यमातुन सदर आश्रम शाळेसाठी वॉटर फिल्टर (५५ लीटर ) भेट देण्यात आला.

त्याप्रसंगी अभिनेते श्रमेश बेटकर यांनी आश्रमशाळेतील मुलांशी व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या, त्यानंतर तेथील मुलांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे स्मितहास्य आणि समाधान पाहायला मिळाले.तसेच राष्ट्रीय स्तरावरील रंगभरण सर्धेमध्ये सदर संस्थेचे सदस्य अभिजीत गोसावी यांचे सुपुत्र, कु. राजवीर गोसावी (इयत्ता – पहिली) याने कांस्यपदक प्राप्त केल्याबद्दल त्यांनादेखील त्याठिकाणी संस्थेतर्फे गौरविण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांना अभिनेते श्रमेश बेटकर यांनी कॉलद्वारे शुभेच्छा देत संस्थेचे आभार मानले.यावेळी आश्रम शाळेचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी,मुख्याध्यापक आनंद कर्पे , संस्था सदस्य रोशनी गोसावी, सचिव प्रीती गुरव, खनिजदार स्वप्नील गोसावी, शिवस्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत खांबळ यांच्यासह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थिती होते.














