घोणसरी ग्रामविकासाची सिने सेलिब्रिटीकडून दखल

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सेलिब्रिटी शिवाली परबने घेतली इंस्टा व्हिडिओची दखल

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग कणकवली तालुक्यातील घोणसरी गावामधील राहणीमान व झालेल्या विकासकामांवर आधारित एक माहितीपूर्ण व्हिडिओ सरपंच प्रसाद रावराणे ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश गोसावी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने गावातील मंदार मराठे व पवन मराठे या तरुणांनी तयार केला असून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या व्हिडिओला महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम व मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या सेलिब्रिटी दूत शिवाली परब यांनी पसंती दर्शवत दखल घेतली आहे.

शिवाली परब यांनी हा व्हिडिओ पाहून तो पसंत करत त्यावर कोलॅबरेशन स्वीकारले असून, घोणसरी गावातील विकासाचे कौतुक केले आहे. सेलिब्रेटी दूत शिवाली परब यांच्या या सहभागामुळे घोणसरी गावातील विकासकामांना राज्यस्तरीय ओळख मिळाली असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या व्हिडिओमध्ये रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, ग्रामपंचायतीच्या उपक्रमांसह गावाच्या एकूण प्रगतीचे चित्रण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामीण भागात सकारात्मक बदल होत असल्याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, शासनाच्या योजनांचा योग्य अंमलबजावणीमुळे गावाचा सर्वांगीण विकास होत असून, सेलिब्रिटींच्या सहभागामुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळेल.

error: Content is protected !!