महिलांसाठी केएमटी बस प्रवास पूर्णपणे मोफत! महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त काँग्रेसचा जाहीरनामा महिलांना समर्पित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना आणि अभिप्रायावर “कोल्हापूर कस्सं ₹? तुम्ही म्हणशीला तस्सं!” असा कोल्हापूरकरांना अपेक्षीत जाहीरनामा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करून खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत भवानी मंडप कोल्हापूर येथे प्रकाशित झाला.

शहरातील सर्व महिला- भगिनींना केंद्रस्थानी ठेवून शाळा- कॉलेजमधील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी, नोकरीसाठी व दैनंदिन प्रवासासाठी KMT बस प्रवास पूर्णपणे मोफत करण्याचा धोरण काँग्रेसचे असणार आहे. त्याचबरोबर हा जाहीरनामा म्हणजे महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबनाचा ठोस आराखडा आहे.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, राजेश लाटकर, सूर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, बाळासाहेब सरनाईक, ॲड. तौफिक मुल्लाणी, सरलाताई पाटील, भारती पोवार, भरत रसाळे, विनायक घोरपडे, माजी महापौर कांचन कावळे, वंदना बुचडे, शोभाताई बोंद्रे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे यांच्यासह काँग्रेसचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!