कर्करोगाच्या लवकर निदानासाठी सिंधुदुर्गात कॅन्सर व्हॅनद्वारे तपासणी सुरू: ९४ रुग्णांची तपासणी
मुख, स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी सिंधुदुर्गात विशेष शिबीर
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या निदानासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कॅन्सर व्हॅन दाखल झालेली आहे. या अंतर्गत बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते फीत कापून या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्जुन नरोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोहन साळुंखे तसेच जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे व सर्व आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी कर्करोग तपासणी अंतर्गत मुखाचा, स्तनाचा तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाकरीता रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबीरामध्ये एकूण 94 रुग्णांची तपासणी करण्यात आली.














