मसुरकर किनई रोड मजबुतीकरण ची वर्क ऑर्डर माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या काळातील – नगरसेविका आर्या राणे

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मंजूर आहे 39 लाखांचा निधी

आयजीच्या जीवावर बायजी उदार सारखी पडेल उमेदवारांची अवस्था

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मसुरकर किनई रोड च्या मजबुतीकरण साठी पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रयत्नातून 39 लाख 92 हजार 720 रुपयांचा निधी प्राप्त आहे. या कामाची वर्क ऑर्डरसुद्धा 20 जून 2025 रोजी झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून होत असलेल्या किनई रोड मजबुतीकरण चे श्रेय घेण्याचा प्रभाग 10 मधील विरोधी पडेल उमेदवारांचा प्रयत्न हा आयजीच्या जीवावर बायजी उदार असल्याचा टोला नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी लगावला आहे. प्रभाग 10 मधील मसुरकर किनई रोड वरील खड्डे बुजबून नंतर त्यावर बी बी एम कार्पेट चे काम करण्याचे काम सध्या सुरू आहे. यव कामाचे श्रेय घेण्यासाठी विरोधी पक्षातील नगरपंचायत निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी विद्यमान नगराध्यक्षांच्या माध्यमातून मसुरकर किनई रोड मजबुतीकरण चे काम सुरू झाल्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत प्रभाग 10 च्या नगरसेविका आर्या राणे यांनी मसुरकर किनई रोड मजबुतीकरण च्या कामाची 20 जून 2025 रोजीची कार्यारंभ आदेशाची प्रत सादर करत हे काम माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याच काळात मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी निधी उपलब्ध केला होता. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर असलेला पावसाळाआणि त्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणूकीची आचारसंहिता असल्याने सदर कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. आता आचारसंहिता संपली असल्यामुळे ठेकेदाराने मसुरकर किनई रोड मजबुतीकरण कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपाच्या माध्यमातून झालेल्या कामाचे श्रेय विद्यमान सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये असा टोलाही नगरसेविका आर्या राणे यांनी लगावला आहे.

error: Content is protected !!