कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेविका जाई निकित मुरकर यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सन २०२७ च्या दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) प्रकाशन सोहळा कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करून जाई निकित मुरकर यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नगरसेविका जाई निकित मुरकर यांनी नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाशन सोहळ्याला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेविका जाई निकित मुरकर, अमेय पारकर, वैभव मालंडकर, हरी निखार्गे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी उपस्थितांनी नगरसेविका जाई निकित मुरकर यांना आगामी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.











