पंचशील स्वयंसहाय्यता महिला समूह बचत गटाच्या फळप्रक्रिया उद्योगाला

जि.प.सदस्या प्राची ईसवलकर व सरपंच महेंद्र गुरव यांनी दिली सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचशील नगर खारेपाटण येथील पंचशील महिला समूह बचत गटाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या फळ प्रक्रिया उद्योगाला नुकत्याच खारेपाटण जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव तसेच गोविंद तळेकर, तालुका व्यवस्थापक (MIS) यांनी सदिच्छा भेट दिली. व या बचत गटाच्या महिलांचे कौतुक करून त्यांच्या व्यवसाया च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पंचशील समूह महिला बचत गटाच्या प्रमुख व सिनियर सी आर पी आस्था पाटणकर यांनी फळ प्रकिया उद्योग विषयी मान्यवरांना माहिती दिली. जि.प.सदस्य प्राची ईसवलकर व सरपंच महेंद्र गुरव यांनी या संपूर्ण व्यवसायाची माहिती जाणून घेतली व पाहणी केली. यावेळी पंचशील समूह महिला बचत गटाच्या अध्यक्ष पूजा कदम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी खारेपाटण जि.प सदस्य प्राची ईसवलकर, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामस्थ अकबर नुर्ले, तालुका व्यवस्थापक गोविंद तळेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

खारेपाटण पंचशील स्वयंसहायता महिला बचत गटाच्या व्यवसायवृद्धी साठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!