निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उपक्रम; गरजूंना अन्नधान्य वाटप
आचरा (प्रतिनिधी) : निसर्गप्रेमी बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, ८ नोव्हेंबर रोजी फोंडाघाट येथील स्नेहसिंधू आश्रमात अन्नधान्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आश्रमातील गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने संस्थेने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी आपल्या परीने सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अन्नधान्य वितरणासाठी इच्छुकांनी धान्य देऊन सहकार्य करावे. आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनीही संस्थेला योगदान देता येईल. तसेच आपल्या मित्रमंडळी व नातेवाइकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक मदत गुगल पे च्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष सुशील परब यांच्या ८२७५३९०९०० या क्रमांकावर पाठवता येणार आहे. या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गरजूंच्या मदतीसाठी हातभार लावावा, असे आवाहन संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुशील परब यांनी केले आहे.











