पालकमंत्री नितेश राणेंकडून सिंधुदुर्गवासीयांना दिवाळी भेट
येवा कोकण आपलोच आसा…मंत्री नितेश राणेंनी मालवणी शब्दांत आनंद केला व्यक्त
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : ऐन दिवाळीच्या तोंडावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासीयांना खुशखबर दिली असून 16 नोव्हेंबर पासून बहुप्रतिक्षित चिपी ते नवी मुंबई विमानसेवेचा शुभारंभ होत आहे. या फ्लाईट चे बुकिंगसुद्धा सुरू झाले आहे. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता नवी मुंबई एअरपोर्ट वरून पहिले विमान टेक ऑफ होणार आहे. आणि त्याच दिवशी सकाळी साडे दहा वाजता चिपी वरून पहिली फ्लाईट नवी मुंबई एअर पोर्ट च्या दिशेने रवाना होणार आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या पनवेल येथील नवी मुंबई एअरपोर्ट च्या दिशेने प्रवास करण्याचे स्वप्न आता 16 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्षात साकारणार आहे.खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या एक्स हँडलवर याबाबत पोस्ट करून येवा कोकण आपलोच असा अशा खास मालवणी शब्दांत आपल्या आनंदभावना व्यक्त केल्या आहेत.











