आता फक्त मराठी माणसा जागा रहा. आणि जाग बाळासाहेबा च्या वचनाला, नाहीतरी तुझी जागा “मुंबईत” राहणार नाही – संदीप सरवणकर

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एकीकरणाच्या वेळी प्रबोधनकार यांनीमुंबईचे बाबतींत जो वसा घेतला होता. त्याचा वारसा जणू म्हणून की काय, काल शिवतीर्थावर, पुन्हा एकदा ठाकरेंच्या एकामागे एक सुनामी तोफा धडधडत होत्या, ते मुंबईचे वस्त्रहरण करणारे दिल्लीत आसनावर बसलेल्या दुर्योधन आणि दुःशासन यांना इशारा देण्यासाठी होत्या हे नक्की.. कारण, अदानीला पुढे करून संपूर्ण देश भर आपला आर्थिक वरदहस्त ठेवण्याचा त्यांचा मनसुबा राज साहेबांनी काल मेळाव्यात सार्वजनिक करून, एका अर्थानी तो उधळून लावला. तसेच आदित्यजीनी “कोविड ते कोस्टल” बाबत पुराव्यासहित उलगडा करून उद्धव साहेबांची घरी बसल्याची नाहक बदनामी करणाऱ्याच्या जोरात चाटा लगावला. उद्धव साहेबांनी सुद्धा, “भाजपा आता चोराची पंढरी कशी झाली आहे”. हे स्वच्छ प्रकाशात आणले. आता सर्व मुंबईकर जनतेला, मुंबईचे वस्त्र फेडणाऱ्या, दुर्योधन आणि दुःशासन जोडीला, त्यांचे मनसुबे पुरे करायला द्यायचे नाहीत, हे चांगले समजले आहे. खरतर मुंबईकर आता खूप लालबुंद झाला आहे. म्हणून मुंबई आता सर्वीकडे भगवामय झालेली दिसत आहे. आता फक्त सोळा तारखेला मराठी च्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मताची गोळा बेरीज करायची बाकी आहे. तेव्हा मराठी माणसा जागा रहा. नाहीतरी तुझी मुंबईत जागा राहणार नाही. हे लक्षात ठेव…

error: Content is protected !!