जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजणार

आज निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद

मुंबई (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आज १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत. सायंकाळी ४.०० वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल येथे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या वेळी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यभरात जि.प. व पं.स. निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!