निकालानंतर शिवाजी पेठेत प्रभाग क्रमांक आठ मध्ये पोलिसांसमोरच दगडफेक, तुंबळ हाणामारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेचा निकाल जाहीर होताच शहरात ठिकठिकाणी विरोधक आमने-सामने आले. कनाननगर आणि शिवाजी पेठेत बोंद्रे आणि खराडे या दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. या घटनांमुळे तणाव वाढला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करीत जमाव पांगवला असला तरी तणाव कायम आहे.

प्रभाग क्रमांक चारमधील कनाननगर येथे दिलीप पवार आणि मयूर पवार यांचे गट आमने-सामने आल्याने धुमश्चक्री उडाली. दोन्ही गट आपसात भिडल्याने हाणामारी झाली. यात महिलांचाही समावेश होता. दगडफेक होताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जमाव पांगवला.

प्रभाग क्रमांक आठमध्ये मानसिंग बोंद्रे यांच्या घराजवळ दगडफेक झाली. यात तीन घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. एका जीपची तोडफोड झाली. पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवले. बंदोबस्तात वाढ केली असून, पोलिसांनी संचलन करून शांततेचे आवाहन केले.

error: Content is protected !!