वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. या कुत्र्याने मंगळवारी सकाळी ५ जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरनीवर आला आहे.
सोमवारी सकाळी जयंवती दत्ताराम पांचाळ ऐणारी, रघुनाथ भिकाजी मोहिते ऐणारी, संतोष बापू शेळके भुईबावडा, राजेंद्र रमेश पाथरे तिरवडे, परशुराम राठोड भुईबावडा या पाच जणांचा कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. सर्व जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.












