सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा “श्री क्षेत्र गाणगापूर” नावाचा दशावतार नाट्य प्रयोग विशेष आकर्षण
आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी भगवतीच्या कृपा प्रसादाने, श्री देवी भगवती उत्साही मंडळ, चिंदर भटवाडी व शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने श्री देव गवळदेव व नि. ब्राह्मणदेव चिंदर भटवाडी पोसेपाणी येथे शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्त सकाळी ९ ते १० अभिषेक, १० ते १ सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते ३ तीर्थप्रसाद, महाप्रसाद, ३ ते ४ हळदीकुंकू, दुपारी ४ ते ५ होममिनिस्टर स्पर्धा, सायं. ५ ते ६ श्री देवी भगवती महिला मंडळ चिंदर भटवाडी, फुगडी, सायं. ६ ते १० श्री देवी भगवती प्रासादिक मंडळ चिंदर भटवाडी यांची दीपोत्सव, आरती, भजन व दिंडी, रात्रौ ठीक १० वा. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण श्री सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ आवेरा, ता. वेंगुर्ला यांचा दत्तभक्तीवर आधारित दत्त नामस्मरणाची महत्त्व सांगणारा, विनोदी, भक्तीमय, हृदयस्पर्शी नाट्यप्रयोग “श्री क्षेत्र गाणगापूर” आयोजित केलेला असून भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भगवती उत्साही मंडळ, चिंदर भटवाडी यांनी केले आहे.











