नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीचा शासकीय रेखाकला परीक्षेचा १०० टक्के निकाल

बांदा (प्रतिनिधी) : विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या विद्यालयाने शासकीय रेखाकला परीक्षा २०२५ मध्ये आपल्या यशाची परंपरा कायम राखत १००% निकाल संपादन केला आहे. एलीमेंटरी आणि इंटरमिजीएट या दोन्ही स्तरांवरील परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.

एलीमेंटरी परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण २३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६ विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी, ४ विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी, तर १३ विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली आहे. यामध्ये गोरक्ष आजगावकर, बाळकृष्ण मिरकर, मयुरी पाटील, देवांग पेडणेकर, आयुष सावंत, विंदबासनी विश्वकर्मा यांना अ श्रेणी प्राप्त झाली. अदिती मयेकर, प्रणिता सावंत, रिद्धी सावंत, विघ्नेश सावंत यांना ब श्रेणी प्राप्त झाला.​

इंटरमिजीएट परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ११ विद्यार्थ्यांनीही १००% निकालाची नोंद केली आहे. यामध्ये २ विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी, २ विद्यार्थ्यांनी ‘ब’ श्रेणी आणि ७ विद्यार्थ्यांनी ‘क’ श्रेणीमध्ये यश मिळवले. यामध्ये चैतन्या मेस्त्री, युगा पालव अ श्रेणी
तर युवराज आईर, सोनल कोठावळे यांनी यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या कलात्मक यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कला शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी चित्रकलेत मिळवलेल्या या यशामुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

error: Content is protected !!