बिनविरोध निवडीनंतर प्राची इस्वलकर पालकमंत्र्यांच्या भेटीला

कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण जि. प. सदस्यपदी बिनविरोध निवडून आलेल्या भाजपाच्या प्राची इस्वलकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या पहिल्या बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्याचा मान प्राची इस्वलकर याना मिळाला. बिनविरोध निवडून आल्यानंतर इस्वलकर यांनी सदिच्छा भेट घेत पालकमंत्र्यांकडे कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, खारेपाटण उपसरपंच मयूर गुरव, पं. स. सदस्य सोनू सावंत, महेश गुरव, प्रसाद सावंत, सदा चव्हाण, प्रकाश सावंत, इब्राहिम शेख, चिन्मय तळेकर उपस्थित होते.

error: Content is protected !!