सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग तसेच कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील पंचायत समित्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (बिनविरोध)
जिल्हा परिषदेत भाजपच्या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
यामध्ये
- स्वप्नश्री जि. प. उमेदवार – प्राची इचलकर (भाजप)
- बांदा जिल्हा प. उमेदवार – प्रवीण कांबळे (भाजप)
- जनावली जि. प. उमेदवार – हर्षदा शिंदे (शिवसेना शिंदे गट)
- पेडळे – जि. प. – सुप्रिया सर्वेश झाडी (भाजप)
- बापर्डे – जि. प. – अवनी अनिल तळी (भाजप)
यांचा समावेश आहे.
कणकवली तालुक्यातील पंचायत समिती (बिनविरोध)
- निढवाडे पंचायत समिती – संजना राणे (भाजप)
- वरवडे पंचायत समिती – सोनू सावंत (भाजप)
देवगड तालुक्यातील पंचायत समिती (बिनविरोध)
- पेडळे – अंकुश यशवंत कुकल (भाजप)
- राणे – गणेश सदाशिव राणे (भाजप)
- बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
वैभववाडी तालुक्यातील पंचायत समिती (बिनविरोध)
- कोकरे पंचायत समिती – साधना सुधीर नकोरे बिनविरोध निवड
या बिनविरोध निवडीमुळे जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक भक्कम झाल्याचे चित्र दिसून येत असून स्थानिक पातळीवर पक्षाच्या कामाची पोच जनतेपर्यंत पोहोचल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.












