साळीस्ते गावातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाराज
खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेत,स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना विश्वासत घेत नसल्यामुळे कणकवली तालुक्यातील खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात समाविष्ट असलेल्या साळीस्ते या गावातील स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते सध्या नाराज असून प्रत्येक वेळी आम्हाला गृहीत धरले जात असल्यामुळे निवडणुकीतील प्रचार यंत्रणेत आपण सहभागी होणार नसल्याचे देखील कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे बोलले जाते.
साळीस्ते येथे आज भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र् तातडीची बैठक उपसरपंच जितेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली साळीस्ते येथे संपन्न झाली.यावेळी भाजप पक्षाचे कार्यकर्ते श्री.मयुरेश लिंगायत,मंगेश कांबळे,व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीमध्ये सर्वानुमते पक्ष आम्हाला विश्वासात घेत नसलल्यामुळे भाजप पक्षाच्या होऊ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील प्रचार यंत्रणेत सहभागी होणार नसल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान भाजप पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ऐकून त्यांचे समाधान करणे गरजेचे असून. तसे न झाल्यास भाजपचा स्थानिक कार्यकर्ता दुखावला जाण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जाते.












