मुंबई मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रनर्सचे यश

चौके (प्रतिनिधी) : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये यावर्षी सिंधुदुर्गातील रनर्सनी सहभाग घेऊन आपले 21 व 42 किलोमीटरचे रन यशस्वीरीत्या पूर्ण केले. यावर्षी या मॅरेथॉन मध्ये विविध वयोगटातील विभागामध्ये 70 हजार रनर्स सहभागी झाले होते.

नुकतीच संपन्न झालेली टाटा मुंबई मॅरेथॉन ही भारतातली नंबर एकची मॅरेथॉन आहे तसेच एशियामधील टॉप टेन मॅरेथॉन मध्ये या मॅरेथॉनचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येकालाच वाटते की आपण हे स्वप्न  मुंबईत पूर्ण करावे. आणि असे ध्येय देऊन सिंधुदुर्ग मधील काही रनर्सनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि यशही संपादन केले.

सिंधुदुर्ग मधील रनरनी यशस्वीरित्या मॅरेथॉन पूर्ण केली. त्यामध्ये डॉ. सोमनाथ परब कट्टा पेंडूर (फुल मॅरेथॉन पाच तास पाच मिनिटे ),
सुजाता रासकर, ओरोस ( फुल मॅरेथॉन सहा तास पाच मिनिटे ),
डॉ. तुषार वेर्लेकर, कणकवली ( हाफ मॅरेथॉन दोन तास 27 मिनिटे ),
डॉ. अंजना काजरेकर, जांभवडे( हाफ मॅरेथॉन  दोन तास 52 मिनिटे)
प्रमोद भोगटे, सिंधुदुर्ग कुडाळ ( हाफ मॅरेथॉन  दोन तास नऊ मिनिटे)
राजेंद्र केसरकर, कुडाळ ( हाफ मॅरेथॉन दोन तास 43 मिनिटे )
तर मुंबईमधील रनर मित्र की जे सिंधुदुर्ग मधील आहेत त्यांनी हाफ मॅरेथॉन पुढील प्रमाणे पूर्ण केली.
रमेश गावडे दोन तास 47 मिनिटे, सचिन साठे दोन तास 50 मिनिटे, संदीप रेडकर दोन तास 48 मिनिटे.

टाटा मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या सर्व धावपटुंचे रांगणा रनर्स व रागिनी तसेच सर्व मित्र परिवाराने खूप खूप हार्दिक अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!