नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या निवासस्थानी 26 जानेवारी रोजी बैठक
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज संघटनेमार्फत दिनांक 5 फेब्रुवारी रोजी संत रविदास महाराज जयंती उत्सव कणकवली पटवर्धन चौक येथे साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संघटनाच्या प्रतिनिधींनी सभेला उपस्थित राहून नियोजनबाबत चर्चा करण्यासाठी दि. 26 जानेवारी, 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या कणकवली येथील घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस उपस्थित राहून नियोजनात भाग घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सुजित जाधव – 9420309230,छोटू कदम – 9403471164, बाबल नांदोसकर – 9405609582, प्राजक्त चव्हाण – 9028390839 या संत रविदास महाराज जयंती उत्सव कृती समिती मंडळातील सदस्यांशी संपर्क साधावा.












