कनेडीत वातावरण तंग
कणकवली (राजन चव्हाण) : कनेडीत भाजपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांत जोरदार राडा झाला असून एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करण्यात आल्याचे समजते. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या कनेडी येथील संपर्क कार्यालयासमोरच ही घटना आज दुपारी घडली. नुकत्याच पार पडलेल्या ग्रा. पं. निवडणूकीतील विजय आणि पराभवाचे पडसाद आजच्या घटनेतून उमटले असून कनेडीत वातावरण तंग झाले आहे. या घटनेनंतर कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव सहकारी पोलिसांसह कनेडीत तात्काळ दाखल झाले होते.












