शाखाप्रमुख पदासह शिवसेनेतून हकालपट्टी
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना शाखाप्रमुख या पदावर कार्यरत असताना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. ही कृती पक्षाच्या धोरणाविरोधात असून ती घोर पक्षशिस्तभंग करणारी आहे. त्यामुळे नागवे शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांचे पक्षशिस्त भंग केल्याबाबत ६ वर्षांसाठी निलंबन करीत असल्याची कारवाई शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल व शिवसेना कणकवली तालुका प्रमुख दामोदर सावंत यांनी केली आहे. शिवसेना नागवे शाखाप्रमुख प्रमोद सांगवेकर यांना या संदर्भात बजावलेल्या पत्रात ते म्हणतात कि शिवसेना पक्षाच्यावतीने आपणास कळविण्यात येते की, आपण शिवसेना शाखाप्रमुख या पदावर कार्यरत असताना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे. ही कृती पक्षाच्या धोरणाविरोधात असून ती घोर पक्षशिस्तभंग करणारी आहे.










