कणकवली (प्रतिनिधी) : एक निर्भिड वक्ता, उत्कृष्ट संसदपटू, आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या बॅ. नाथ पै यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा विध्यार्थी कु. तनय सिद्धेश नातू ( 9 th) याने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव प्राध्या. हरिभाऊ भिसे, सहसचिव प्राध्या. निलेश महिंद्रकर, खजिनदार शीतल सावंत, सल्लागार डी. पी. तानावडे, मुख्याध्यपिका अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे.










