नाटळ–सांगवे जि.प. मतदारसंघात महायुतीचा जोरदार प्रचार

दारिस्ते गावात संदेश (गोटया) सावंत, राजश्री पवार यांची घरोघरी प्रचारफेरी

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ सांगवे जिल्हा परिषद मतदार संघातून जिल्हा परिषद उमेदवार संदेश (गोटया) सावंत व पंचायत समिती नरडवे उमेदवार राजश्री पवार यांचा प्रचार चालू आहे.त्यामध्ये आज दारिस्ते गावातील प्रचारार्थ भाजपचे कार्यकर्ते जिल्हा परिषद चे उमेदवार गोटया सावंत यांच्या प्रचारार्थ गावातून घरोघर प्रचार यंत्रणा चालू आहे. या प्रचारासाठी स्वतः गोट्या सावंत,पंचायत समिती सदस्य उमेदवार राजश्री पवार,स्टार प्रचारक संजना सावंत,सरपंच सानिका गावकर, उपसरपंच संजय सावंत,ज्येष्ठ नागरिक रासम काका व कमीत कमी दारिस्ते गावातील 100 लोक प्रचारासाठी घराघरात जाऊन उमेदवार गोट्या सावंत यांचा प्रचार करत आहेत आणि त्यामुळे आज दरिस्ते गावामध्ये महायुतीचा जोरदार प्रचार चालू आहे. गोटया सावंतांच्या प्रेमाखातर व त्यांची काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून दरिस्ते गावातील लोक आज गोट्या सावंत यांच्या प्रचारासाठी दारिस्ते गावातील जनता एकवटली आहे हीच गोटया सावंत यांच्या विजयाची नांदी आहे.

error: Content is protected !!