श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथे मान्यवरांचा सत्कार ; स्वररंग कार्यक्रमाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : हिंदू संस्कृतीबद्दल असलेला वारसा जतन करण्याचं काम श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथील पुरातन दत्त मंदिरात सुरु आहे. अतिरुद्र स्वाहाकार या धार्मिक कार्यक्रमातून जनकल्याणार्थ 9 दिवसाचा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमाचे कर्ता करविता विलास खानोलकर हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. अतिरुद्र स्वाहाकारामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हिंदू समाज रक्षणासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत वरवडे पंचायत समिती नुतन बिनविरोध सदस्य सोनु सावंत यांनी केले.
श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथील पुरातन दत्त मंदिर येथे नुतन वरवडे पंचायत समिती बिनविरोध सदस्य सोनु सावंत, संतोष कानडे, पत्रकार भगवान लोके , उद्योजक रामू विखाळे, भजनी बुवा विनोद चव्हाण,केदार कदम यांचा सत्कार अध्यक्ष विलास खानोलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष विलास खानोलकर,सरपंच महेश गुरव, चार्टड अकाउंटंट अमोल खानोलकर,माजी सरपंच बाळा बाणे,पांडूरंग बाणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
संतोष कानडे म्हणाले,आशिये दत्तमंदिरात हा 9 दिवस चालणारा अतिरुद्र स्वाहाकाराचा कार्यक्रम आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. जनकल्याणार्थ या मंदिरात धार्मिक विधी सर्वांनाच एक धार्मिक अधिष्ठान देणारा आहे. हिंदू समाज रक्षणासाठी अतिरुद्र स्वाहाकारासारखे कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजाची एकजुट वाढते व धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहते.
भगवान लोके म्हणाले, श्री दत्तक्षेत्र आशिये मठ हे पुरातन दत्त मंदिर आहे.या दत्तमंदिराच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त विलास खानोलकर यांनी अतिरुद्र स्वाहाकार हा महाअनुष्ठानाचा धार्मिक कार्यक्रम घेतला. हा जनकल्याणार्थ असून त्या मागील त्यांची अपार श्रध्दा दिसून येत आहे. 25 जानेवारीपासून 151 ब्राम्हणांकर्वी शिवपिंडीवर अभिषेक केला जात आहे.हिंदू समाज रक्षणाच्या दृष्टीने अतिरुद्र स्वाहाकार ची संकल्पना ख-या अर्थाने सत्यात उतरवली आहे.
अमोल खानोलकर म्हणाले, आमचा छोटासा गाव असला तरी विलास खानोलकर यांच्या पुढाकाराने असे विविध कार्यक्रम होत असतात. अतिरुद्र स्वाहाकार यश्स्वी करण्यासाठी आमच्या गावाचे सहकार्य आम्हाला लाभले. हा महाअनुष्ठान धार्मिक विधी जनकल्याणार्थ आहे.या कार्यक्रमाचे आभार सरपंच महेश गुरव यांनी मांडले.
नामवंत गीतकारांचा स्वररंग कार्यक्रम
श्री दत्तक्षेत्र आशिये मठ येथे दि. 31 जानेवारी रोजी सकाळी अतिरुद्र स्वाहाकार त्यानंतर रात्रौ 8 वाजता स्वररंग कार्यक्रम – गायक दिलीप ठाकूर, राधा जोशी, स्वप्निल घोरे,1 फेब्रुवारी रात्रौ 8 वाजता लोकरंग सादरकर्ते रंगखाम सिंधुदुर्ग ( श्री श्रीधर पाचंगे आणि सहकारी ), 2 फेब्रुवारी अभंगरंग (पं.श्री.जयतीर्थ मेवुंडी, धारवड,कर्नाटक ) हे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विलास खानोलकर यांनी केले आहे.
फोटो कॅप्शन – श्री दत्तक्षेत्र आशिये मठ पुरातन दत्त मंदिर येथे नुतन बिनविरोध वरवडे पंचायत समिती सदस्य सोनु सावंत यांचा सत्कार करताना विलास खानोलकर, व्यासपीठावर संतोष कानडे, भगवान लोके, अमोल खानोलकर,रामदास विखाळे बुवा विनोद चव्हाण, बुवा केदार कदम व दुस-या छायाचित्रात उपस्थित दत्तभक्त.










