फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मध्ये सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आणि फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील लिपीक दीपक इस्वलकर यांच्या मातोश्री श्रीमती आनंदी दत्ताराम इस्वलकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ९८ व्या वर्षी दुःखद निधन राहत्या घरी झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना ,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या शांत, संयमी, आणि मदतीसाठी धावणाऱ्या स्वभावामुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
क्रीडापटू दीपक इस्वलकर यांना मातृशोक !












