खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातील महायुतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या मतदार संघात सुरू असून या निवडणुकीत त्यांना गावा गावातील महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे जिल्ह्यातील १ नंबर च्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख श्री मंगेश गुरव यांनी व्यक्त केला आहे.
खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार श्री गुरुप्रसाद शिंदे हे व्यवसायाने युवा उद्योजक म्हणून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यात ओळखले जातात. व्यवसायाबरोबरच सामाजिक गुण अंगी बाळगून राजकारनाबरोबरच सामाजिक कार्य करणारे खारेपाटण दशक्रोशीतील एक उभारत युवा नेतृत्व म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.
खारेपाटण ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले गुरु शिंदे हे शिवसेना शिंदे पक्षाचे खारेपाटण विभाग प्रमुख म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.तर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे ते संचालक आहेत. या बरोबरच राजापूर तालुका चिरे खान व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष असून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या प्राधिकरण समितीचे ते सदस्य आहेत.
मंगेश गुरव पुढे म्हणाले खारेपाटण मतदार संघात महायुतीच्या माध्यमातून विकासकामे झाली आहेत आणि होत आहे.माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे आमदार आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत उपनेते संजय आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत असून खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात जरी तिरंगी लढत होत असली तरी निवडणूकित प्रत्यक्ष विजयाचा गुलाल हा आमचाच उधळणार आहे.त्यामुळे जनता आमच्या सोबत असून खारेपाटण पंचक्रोशी तथा या विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गुरुप्रसाद शिंदे हे महायुतीचे एक सक्षम उमेदवार आणि युवा नेतृत्व उमेदवार आम्ही जनतेसमोर निवडणुकीच्या माध्यमातून उभा केला असून गुरूप्रसाद शिंदे यांनाच विजयी करून महायुतीचे हात बळकट करा असे आवाहन देखील श्री मंगेश गुरव यांनी मतदारांना केले आहे.












