वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठात महेश इंगळे यांचा सन्मान…!

आचरा (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थाचे मुळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी मित्रपरिवार व विश्वस्त महेश गोगी, सचिव आत्माराम घाटगे यांच्या समवेत मालवण तालुक्यातील वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी वायंगणी श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने चेअरमन तथा मालवण पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांनी चेअरमन महेश इंगळे,
सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत हडकर,दिनेश साळकर, सुनिल खरात, प्रफुल्ल माळकर, कल्याण साळकर, डॉ.हिरण्णा पाटील, बाबा सुरवसे, अंकुश केत,

प्रा.शिवशरण अचलेर, बाबा सुरवसे, विश्वनाथ देवरमनी सर आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!