दत्तात्रय हिर्लेकर यांचे सौजन्य
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील जि प शाळा ओसरगाव नं. १ मध्ये विज्ञान विषयाची आवड आणि जिज्ञासा वाढविण्याच्या उद्देशाने आदरणीय दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरूजी यांनी “मानव आणि विज्ञान – टाकाऊपासून टिकाऊ साहित्य निर्मिती” या विषयावरील ३५ विज्ञान प्रयोगांचे उपयुक्त पुस्तक २३ विद्यार्थ्यांना भेट दिले. तसेच शाळेच्या ग्रंथालयासाठी पाच पुस्तके देऊन त्यांनी शाळेच्या शैक्षणिक कार्यात मोलाची भर घातली.
या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल प्रयोगशीलता, सर्जनशीलता आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ साहित्य तयार करण्याची संकल्पना विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन व स्वावलंबनाची महत्त्वपूर्ण शिकवण देणारी ठरणार आहे.हिर्लेकर सरांचा हा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.असे शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम यांनी प्रतिपादन केलेया प्रसंगी मुख्याध्यापक किशोर कदम, पदवीधर शिक्षिका शितल दळवी, उपशिक्षक राजश्री तांबे व प्रमिता तांबे उपस्थित होते.












