फोंडाघाट मध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट ग्रामपंचायत आणि ओम कर्तव्य साधना हॉस्पिटल, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते…
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, सरपंच सौ. संजना आग्रे यांनी, ग्रामपंचायतीकडून दरवर्षी विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.नेत्र शिबिराचा ग्रामीण भागातील रुग्णांनी लाभ घ्यावा. डोळ्यांची काळजी आणि उपचार याची माहिती समजून घेताना, दृष्टीतून सृष्टी अनुभवावी असे सांगितले…
यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, स्टाफ मनिषा चव्हाण, प्रज्ञा सामंत तसेच नेत्रचिकित्सक स्नेहल पाटणे, सहकारी मयूर हुले, स्नेहा धुरी इत्यादी उपस्थित होते. वाडीवरील अनेक रुग्णांनी लाभ घेतला यामधील १० मोतीबंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत…












