कणकवली (प्रतिनिधी) : श्री सद्गुरू धर्मराज महाराज यांचा रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजेच 25 वा पुण्यतिथी सोहळा सोमवार दि. 23 फेब्रुवारीला शहरातील बाळागोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधीस्थानी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत रुद्र स्वाहाकार, समाधीपूजन, दुपारी 12.30 वा. आरती, तीर्थप्रसाद, 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 7.30 वाजेपर्यंत भजनांचा कार्यक्रम, रात्री 7.30 वा. दीपोत्सव, 8.30 वा. महाआरती, रात्री 9 वा. श्री देवी सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळ, पावशी यांचे भक्तांची पाठीराखी आदिमाया हा प्रयोग होईल. तरी सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कांबळे गल्ली बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान कणकवली यांच्यावतीने करण्यात आले आहे.












