जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणेंचा यशस्वी पाठपुरावा
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लोरे नं. 2 गावातील पाच वाड्यांमधील गणपती घाट विसर्जन कामाचा प्रारंभ जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केलेल्या निधीतून, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या प्रयत्नातून लोरे नं. 2 गावातील डोंगरेवाडी, नाचणेकरवाडी, हेळेवाडी, दुधमवाडी, सकंपाळवाडी या पाच वाडयांचा गणपती विसर्जन घाट बांधण्यासाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोरे जिल्हा परिषद सदस्य रिद्धी रितेश सुतार, लोरे पंचायत समिती सदस्य सिद्धेश दिलीप रावराणे, लोरे सरपंच विलास नावले, रितेश सुतार, बूथ अध्यक्ष प्रकाश गवानकर, भरत मांजलकर, उदयोजक अनंत मांजलकर, सत्यजित रावराणे, अभिजित रावराणे, गुरुराज डोंगरे, महेंद्र रानम, चंद्रकांत सावंत, अजय मांडवकर, यशवंत नाचणेकर, संदीप वारेसे, भास्कर पांचाळ, प्रकाश संकपाळ, अशोक सावंत, सुनील आग्रे आदी उपस्थित होते.












