वायंगणी ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदिप ग्रंथालय वायंगणी या ग्रंथालयाला नुकतीच ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते २ यावेळेत ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे तालुकास्तर विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा पुढीलप्रमाणे विषयवार घेण्यात येणार आहेत. स्पर्धा पुढील प्रमाणे :-

गट क्रमांक १
इ. १ ते ४ थी – कशाकथन स्पर्धा

विषय – प्राणीकथा – वेळ – ३ ते ४ मिनिटे

बक्षिसे –
प्रथम क्रमांक – रोख ५००/- व चषक
द्वितीय क्रमांक – रोख ३००/- व चषक
तृतीय क्रमांक – रोख २००/- व चषक
उत्तेजनार्थ १ – रोख १५०/- व चषक
उत्तेजनार्थ २ – रोख १००/- व चषक

गट क्रमांक २
इ. ५ वी ते ७ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा

विषय-छत्रपती शिवरायांचे पराक्रम – वेळ ५ ते ६ मिनिटे

बक्षीस –
प्रथम क्रमांक – रोख ७००/- व चषक
द्वितीय क्रमांक – रोख ५००/- व चषक
तृतीय क्रमांक – रोख ३००/- व चषक
उत्तेजनार्थ १ – रोख २००/- व चषक
उत्तेजनार्थ २ – रोख १५०/- व चषक

गट क्रमांक ३
इ. ८ वी ते १० वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा

विषय – शोध आणि संशोधक – वेळ ५ ते ६ मिनिटे

बक्षीस –
प्रथम क्रमांक – रोख १०००/- व चषक
द्वितीय क्रमांक – रोख ७५०/- व चषक
तृतीय क्रमांक – रोख ५००/- व चषक
उत्तेजनार्थ १ – रोख ३५०/- व चषक
उत्तेजनार्थ २ – रोख २५०/- व चषक

गट क्रमांक ४
इ. ११ वी ते १२ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा

विषय- लोकशाहीची सद्यस्थिती – वेळ ५ ते ६ मिनिटे

बक्षीस –
प्रथम क्रमांक – रोख १५००/- व चषक
द्वितीय क्रमांक – रोख १०००/- व चषक
तृतीय क्रमांक – रोख ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ १ – रोख ५००/- व चषक
उत्तेजनार्थ २ – रोख ४००/- व चषक

गट क्रमांक ५
इ. १३ वी ते १५ वी स्पर्धा – वक्तृत्व स्पर्धा
विषय- जलव्यवस्थापन काळाची गरज- वेळ ६ ते ७ मिनिटे

बक्षीस –
प्रथम क्रमांक – रोख २०००/- व चषक
द्वितीय क्रमांक – रोख १५००/- व चषक
तृतीय क्रमांक – रोख १०००/- व चषक
उत्तेजनार्थ १ – रोख ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ २ – रोख ५००/- व चषक

गट क्रमांक ६
तालुका ग्रंथालय कर्मचारी
स्पर्धा -कादंबरी समिक्षा

विषय – कादंबरीचे नाव – पाणीपत – शिवाजी सावंत वा कोसला – भालचंद्र नेमाडे – वेळ ५ ते ६ मिनिटे

बक्षीस –
प्रथम क्रमांक – रोख १५००/- व चषक
द्वितीय क्रमांक – रोख १०००/- व चषक
तृतीय क्रमांक – रोख ७५०/- व चषक
उत्तेजनार्थ १ – रोख ५५०/- व चषक
उत्तेजनार्थ २ – रोख ४५०/- व चषक

सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेणार्‍या स्पर्धकांनी आपली नावे दि. ७/३/२०२६ पर्यंत नोंदवावीत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी – संपर्क सौ. गोगटे – ९४०५९३००१०, सौ. प्रभु – ७४९९८५२१३५, सौ. बांदेकर – ८५५०९०९८२८ यांच्याशी संपर्क साधवा. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन ज्ञानदीप ग्रंथालय वायंगणीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!