रक्तदान शिबिर, अभिवादन रॅली, शिवसन्मान-शिवसत्कार, विद्यार्थी गुणगौरव, अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवजयंती दिनी सांगुळवाडी ग्रामस्थ आयोजित शिवमहोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला. महोत्सवाचे उद्घाटन सरपंच स्नेहल भोवड यांच्या हस्ते झाले. शिव महोत्सवानिमित्त आयोजित शिवमहोत्सवाच्या पूर्वदिनी रक्तसिंधु मित्र प्रतिष्ठान, एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने पार पडलेल्या रक्तदान शिबिरात २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमात यशस्वी व्यावसायिक रवींद्र धोंडू पाटील यांचा ‘शिवसन्मान’, तर समाजसेवक व उद्योजक रमेश मारुती रावराणे यांचा ‘शिवसत्कार’ करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी-बारावी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल जाधव यांनी तर सूत्रसंचालन राहुल जाधव यांनी केले. शेवटच्या सत्रात जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ या शाळेने व माजी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती प्रदर्शित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिग्विजय सुतार, मेघ:शाम रावराणे, अक्षय पाटील, राहुल जाधव, स्वप्निल रावराणे, अमित जाधव, पंकज विश्वासराव, स्वप्नील शिर्के, सचिन रावराणे, सचिन जाधव, योगेश पांचाळ, रोशन राणे, प्रफुल्ल जाधव आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विचारमंचावर उपसरपंच बाळाजी रावराणे, शा. व्य. समिती अध्यक्ष समीर रावराणे, ग्रा. पं. सदस्य सत्यवान सुतार, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू पडवळ, महादेव शेट्ये, प्रकाश पाटील, प्रकाश रावराणे, भगवान जाधव, प्रा. जगदीश राणे, मुख्याध्यापक स्नेहलता राणे, विद्याधर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.












