कणकवली (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा भिरवंडे व बौध्द विकास मंडळ भिरवंडे पुरस्कृत पंचशील सेवा मंडळ भिरवंडे यांच्यावतीने भगवान गौतमबुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार, ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. भिरखंडे चव्हाटा येथील समाज मंदिरमध्ये हा महोत्सव होणार आहे. संयुक्त जयंती महोत्वाच्या निमित्ताने ३ मे रोजी तालुकास्तरीय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा होणार असून रात्री ९ वा. महिला सक्षमीकरण कार्यक्रम होणार आहे. ४ मे रोजी रात्री २ वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. ५ मे रोजी सकाळी ९ वा. पंचशिल ध्वजारोहण, ९.३० वा. सुत्तपठण, दु. १२ वा. भव्य भीमरॅली, सायं. ४ वा. फनीगेम्स व रात्री ९.३० वा. बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास सरपंच नितीन सावंत, माजी पं.स. सदस्य मंगेश सावंत, अर्जुन कांबळे, विठ्ठल पवार, तुकाराम पवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुडाळ संत राऊळ महाराज विद्यालयाचे प्रमोद जमदाडे हे उपस्थित राहणार आहेत. ५ मे रोजी रात्री १०.३० वा. चंद्रभागा प्रोडक्शन निर्मित ‘आलाय मोठा शहाणा’ है विनोदी नाटक होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थाध्यक्ष प्रमोद कांबळे, सरचिटणीस मंगेश कांबळे व सर्व पदाधिकारी, महिला मंडळ यांनी केले आहे.