पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कणकवलीत होणार विकासकामांचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नलावडेंचा विकासकामांचा धडाका

कणकवली (प्रतिनिधी): पालकमंत्री रविंद चव्हाण यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन 4 मे रोजी होणार आहे. आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सत्ताधारी नगरसेवकांनी कणकवली शहरात विकासकामांचा एकच धडाका सुरू केला आहे. 4 मे रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोनगेवाडी गार्डन नूतनीकरण, रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी रस्ता बनविणे, जुना नरडवे रोड ते पिळणकर वाडी रस्ता तयार करणे या कामांचा शुभारंभ केला जाणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आ.निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ.वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!