दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील सब-स्टेशनच्या आवारात आज अचानक आग लागली. माहिती मिळताच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा नुकसान झाले नाही. उप अभियंता, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, संजय सातार्डेकर व समीर रेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपास सुरू आहे. घटनेची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी दिली होती.
विजवितरणच्या सासोली सबस्टेशन आवारात आग लागल्याने उडाली तारांबळ











