कणकवली संजय गांधी निराधार योजना समिती बैठकीत 64 प्रस्ताव मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक नुकतीच घेण्यात आली. तहसीलदार कार्यालय कणकवली येथे घेण्यात आलेल्या या बैठकीत एकूण 64 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

संजय गांधी योजना समिती अध्यक्ष शरद कर्ते, यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला सचिव दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जी. एम. कोकरे संजय गांधी नायब तहसिलदार, संगायो समिती सदस्य, सुजाता हळदिवे, विजय कातरूड, भगवान दळवी गुरुनाथ वर्देकर व गजानन शिंदे, तसेच संजय गांधी शाखा कर्मचारी हे उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना 42. श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना 19, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना 03 एकूण 64 प्रकरणाना यावेळी मंजुरी देण्यात आली

error: Content is protected !!