रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी श्री दत्तगुरु चवठा हिरवा क्रीडा नगरी माणकोली भिवंडी डोंबिवली ( प ) येथे पार पडणार क्रीकेट स्पर्धा
वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दि.१५ मार्च २०२६ रोजी चारवाडी चषक २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्तगुरु चवठा हिरवा क्रीडा नगरी माणकोली भिवंडी डोंबिवली ( प ) येथे या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकास २०,००१, द्वितीय क्रमांकास १५,००१ या व्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी वैयक्तिक विशेष पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत संघाचा सहभाग नोंदविण्यासाठी २२००/- प्रवेश फी सह दशरथ बाणे यांच्याकडे ९७०२१३६१६६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समस्त चारवाडीकर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












