चौके (प्रतिनिधी) : आविष्कार फाऊंडेशन महाराष्ट्र इंडियाच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार यावर्षी अमृतनाथ सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले या मंडळातील सहा कलाकारांना प्राप्त झाला आहे. हे पुरस्कार कला क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलाकारांना प्रदान केले जातात. मालवण तालुक्यातील कुभांरमाठ येथील जानकी हॉटेल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महेश गोसावी, महादेव नाईक, रामचंद्र परब, महेश वालावलकर, सोमा परब, विनोद राणे यांना हा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला या कलाकारांच्या कलेची नोंद घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामुळे या कलाकारांचे सर्व स्तरातुन अभिनंदन व कौतुक होत आहे.
अमृनाथ सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले या मंडळातील कलाकारांची कलारत्न पुरस्कारासाठी निवड












