वैभववाडी तालुक्यात प्रथम तिन्ही क्रमांकावर कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्चस्व
कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे केले अभिनंदन
वैभववाडी तालुका (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आज एच. एस. सी फेब्रुवारी २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला असून वैभववाडी तालुक्यात कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आकांक्षा अजित खाडे हिने ५४१ ( ९०.१७ टक्के) गुण मिळवून प्रशालेसह वैभववाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला तर कला शाखेची विद्यार्थिनी निहारीका विठोजी पाटील हिने ५४०( ९०.००) गुण मिळवून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि कु.संपदा प्रितम जाधव हिने कला शाखेतून ५३६ (८९.३३) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. शिवाय पायल लिंगायत हिने ५२३ गुण मिळवून चौथ्या क्रमांक तर तृष्णा घाडी ५११ गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे. प्रशालेतील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून एकूण २०६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेच्या सर्व शाखांचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.













