वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल 97.97%; आकांक्षा खाडे तालुक्यात प्रथम

विज्ञान, कला व वाणिज्य शाखेत रावराणे महाविद्यालयाची शतप्रतिशत कामगिरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्ता बारावीचा वैभववाडी तालुक्याचा निकाल 97.97 टक्के लागला आहे. तालुक्यातून कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी आकांक्षा अजित खाडे हिने 90.17 % गुण मिळवत क्रमांक प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच कनिष्ठ महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी निहारिका विठोबा पाटील हिने 90. % गुण मिळवत द्वितीय तर संपदा प्रीतम जाधव घेणे 89.33 % गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे. तालुक्यातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे तिन्ही विद्यार्थी हे कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे असून महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

कनिष्ठ महाविद्यालय निहाय निकाल खालील प्रमाणे..
कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी कला शाखेतून 40 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक निहारिका विठोजी पाटील (90%,) द्वितीय क्रमांक संपदा प्रीतम जाधव (89.36% )तृतीय क्रमांक रिया चंद्रकांत माळकर (71.83%.)

या महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून 79 टक्के विद्यार्थी प्रविष्ट होते ते सर्व उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.  या शाखेतून प्रथम क्रमांक आकांक्षा अजित खाडे (90.17%)  मिळवत शाखेतून तसेच तालुक्यातून प्रथम आली आहे. द्वितीय क्रमांक  पायल प्रदीप लिंगायत (87.17%), तृतीय क्रमांक कृष्णा संदीप घाडी (85.17%)

विज्ञान शाखेतून 87 विद्यार्थी प्रविष्ट होते ते सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाल्यामुळे शाखेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक गौरी संजय चव्हाण (19.83) टक्के,  द्वितीय क्रमांक यश अशोक पाटील (79%) तृतीय क्रमांक प्रीती नितीन राव राणे (77% )

आचिर्णे आर्ट कॉमर्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज या कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून 98 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल 95. 91टक्के लागला आहे. शाखेतून प्रथम श्रेया संदीप शेळके (83%) द्वितीय क्रमांक सखाराम मोतीराम गुरखे (75.88) तृतीय क्रमांक श्रुती संतोष. वाणिज्य शाखेतून 31 विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले या शाखेचा 93.54 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम समीक्षा रामदास शेलार (76.50) द्वितीय रोशनी रवींद्र शिंदे (72.17%.) तृतीय सिद्धी सूर्यकांत मांडवकर (66.17% )
  
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेर्ले तिरवडे या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 92.85 टक्के लागला असून कला शाखेतून एकूण 14 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी तेरा उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक सिद्धीका हरिश्चंद्र गुरव (66.33%) द्वितीय पूजा दशरथ सुतार (56.83%) तृतीय ऋतुजा संतोष आयरे (५३.८८ )

आकांक्षा खाडे ५४१ ९०.१७%

निहारीका पाटील 90%

संपदा जाधव 89.33 %

error: Content is protected !!