सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे मुलींनीच गुणवत्तेत बाजी मारली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला असला तरी कोकण विभागाने सर्वाधिक निकालाची नोंद केली आहे. तर लातूर विभागाचा निकाल राज्यात सर्वात कमी लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून https://mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकाल जाहीर करताना राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.
अधिकृत वेबसाइट्स: mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, किंवा mahahsscboard.in वर भेट द्या।
निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये काय?
राज्याचा एकूण निकालः ८९.७९%
मुलींचा निकालः ९३.१५%
मुलांचा निकालः ८६.८० %
सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण
कोणत्या विभागाचा निकाल किती लागला?
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखला. मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे.
पुणे ९१.२५
नागपूर ८८.६७
छत्रपती संभाजीनगर ८८.६८
कोल्हापूर ८९.९७
अमरावती ९०.९२
नाशिक ९०..७२
लातूर ८४.१४
कोकण ९४.१४
मुंबई ९०.०८












