पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिमाका महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आदी उपस्थित होते.
यावेळी पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कायदा व सुव्यवस्था राखताना दाखवलेली तत्परता आणि जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत पालकमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देखील यावेळी प्रदान करण्यात आला. समाजकार्य, महिला सक्षमीकरण आणि लोकहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा या पुरस्काराद्वारे गौरव करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोक संचालित साधन केंद्र संस्थांना सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांची यावेळी दखल घेण्यात आली. तसेच लाडकी बहिण क्रेडीट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रवर्तकांचाही गौरव करण्यात आला. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत नियुक्तीपत्रे देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कर्तृत्वाचा सन्मान आणि समाजाभिमुख कार्याचा गौरव करणारा हा सोहळा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे प्राप्त सन्मानचिन्ह प्रदान करणे तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी करणारे अंमलदार यांचा सत्कार करण्यात आला.
उल्लेखनिय कामगीरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार
1) सुनिल दत्तात्रय राणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक, आचरा पोलीस ठाणे
2) राजन बंडु पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक, वैभववाडी पोलीस ठाणे
3) सुमित रामचंद्र पिरणकर, सहा. पोलीस उपनिरीक्षक, सावंतवाडी पोलीस ठाणे
4) राकेश रविंद्र कडुलकर, पोलीस हवालदार, कणकवली पोलीस ठाणे
5) विनय नारायण पास्ते, पोलीस हवालदार, सावंतवाडी पोलीस ठाणे
6) विनोद वसंत पाडळकर, पोलीस हवालदार, गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग
७) पुरुषोत्तम चंद्रकांत खडपकर, सहा. पोलीस उप निरीक्षक, मालवण पोलीस ठाणे
८) बाळकृष्ण प्रकाश गवस, पोहेकॉ, दोडामार्ग पोलीस ठाणे
९) मानसी महेश गावडे, मपोना, दोडामार्ग पोलीस ठाणे
जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
१) अक्षता अनिल कांबळी, पुरस्कार प्राप्त वर्ष- 2020-21,
२) ॲड. नम्रता श्रीराम नेवगी- पुरस्कार प्राप्त वर्ष 2021-22
३) सुजाता अजित पडवळ- पुरस्कार प्राप्त वर्ष 2022-23,
४) श्रावणी सतीश मदभावे- पुरस्कार प्राप्त वर्ष 2023-24
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा सिंधुदुर्ग उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या लोक संचलित साधन केंद्र, सिंधुदुर्ग संस्था
हिरकणी CMRC- सीमा गावडे, सोनाली कावले,
माहेर CMRC – वैष्णवी नाईक, भक्ती दळवी,
स्वाधार CMRC – प्रतीम केरवडेकर, मानसी धुरी,
सिंधुकन्या CMRC – गीता चौकेकर, रिया घाडी,
अन्नपूर्णा CMRC – आस्मिता जाधव, उषाकला केळुसकर
लाडकी बहिण क्रेडीट को ऑप सोसायटी सिंधुदुर्ग नोंदणी प्रमाणपत्र वितरण मुख्य प्रवर्तक आणि प्रवर्तक
हिरकणी CMRC – शितल मांजरेकर, उत्कर्षा धुमाळे, भाग्यश्री भागवत,
माहेर CMRC – सान्वी कदम, सुशांत ओरोन्देकर, शिल्पा पवार,
स्वाधार CMRC – मानसी धुरी, दक्षता मेस्त्री, मारिया ओरॉज,
सिंधुकन्या CMRC -स्मिता लंगोटे, प्रीतम जाधव,
अन्नपूर्णा CMRC – अनुराधा नाईक, उष:कला केळुसकर
लाड पाग समितीच्या शिफारशीनुसार सफाईकामगारांच्या वारसांना जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती
सुमित सुनील जाधव- पद- वरिष्ठ सहायक, संस्कार सचिन पडेलकर-परिचर, रवींद्र राचमंद्र चव्हाण-पद परिचर, पास्कीन जेरॉन रॉड्रीक्स- पद कनिष्ठ सहायक लिपिक, रामा विजय सावंत-पद परिचर, पुजा मधुकर गावडे- पद कनिष्ठ सहायक लिपिक, शंकर अशोक काळसेकर –पद कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी, किरण प्रकाश मेस्त्री-पद परिचर, किरण वसंत राणे पद- परिचर.



















