खारेपाटण (प्रतिनिधी) : जय हनुमान मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने फक्त खारेपाटण गाव मर्यादित प्रत्येक वाडीवार एक संघ टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धा अर्थात खारेपाटण प्रमियर लीग -२०२३ मध्ये केदारेश्वर खारेपाटण हा संघ अंतिम विजेता ठरला असून के सी सी खारेपाटण हा संघ या स्पर्धेचा उपविजेता ठरला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर,ग्रा प सदस्य गुरूप्रसाद शिंदे,किरण कर्ले, जयदीप देसाई, अस्ताली पवार,संतोष पाटणकर, मंगेश गुरव, विरेंद्र चिके, भाऊ राणे, विजय देसाई, मंगेश गुरव, संकेत शेट्ये, परवेज पटेल, सत्यवान खांडेकर, विट्टल गुरव, अनंत गांधी, जय हनुमान मित्र मंडळ खारेपाटण चे कार्यवाह महेश कोळसुलकर,शाम कोळसुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री देव केदारेश्वर मैदानावर खारेपाटण येथे सलग दोन दिवस चाललेल्या या खारेपाटण प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम विजेता संघाला रोख रुपये १००२३/- व आकर्षक चषक तर उपविजेता के सी सी संघाला रोख रुपये ७०२३/- व आकर्षक चषक उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आला.तर उत्कृष्ट फलंदाज व सामनविर म्हणून केदारेश्वर संघाचा खेळाडू किरण कर्ले तर उत्कृष्ट गोलदाज म्हणून ओंकार गुरव यांना चषक देऊन गौरविण्यात आले.तसेच मालिकावीर म्हणून के सी सी संघाचा खेळाडू किशोर निग्रे याला आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
” खारेपाटण मध्ये अशा प्रकारचे फक्त गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धा भरवून उपेक्षित खेळाडूंना न्याय देण्याचे काम या मंडळाने केले असून. खेळाच्या निमित्ताने एक गाव एक संघ ही भावना खेळाडूंमध्ये निर्माण केली. असल्याचे प्रतिपादन खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर यांनी बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी व्यक्त केले.
जय हनुमान मित्र मंडळाचे कार्यवाह श्री महेश कोळसुलकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले.तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान मित्र मंडळच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.