खनिकर्म मंत्री दादा भुसे यांची बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे याना ग्वाही
मुंबईत घेणार सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूरमधील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण, सिलिका माईन्स आदी गौणखनिज सह खनिज व्यावसायिकांच्या अडचणींसंदर्भात खनिकर्म मंत्री दादा भुसे यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी भेट घेत विस्तृत चर्चा केली. यावेळी माजी सभापती संदेश पटेल, भूषण परुळेकर आदी उपस्थित होते. शासकीय रॉयल्टी तसेच अटी शर्ती चे पालन करूनही खनिज व्यावसायिकाना व्यवसाय करताना अडचणी येतात. जिल्ह्यातील खनिज व्यावसायिकांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी आग्रे यांनी मंत्री भुसे यांच्याशी विस्तृत चर्चा करत यावर तातडीने उपाय काढण्यासाठी महसूल तसेच खनिकर्म अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.आग्रे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर खनिकर्म मंत्री भुसे यांनी सिंधुदुर्गसह कोल्हापूर आणि नागपूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत आपल्या दालनात आयोजित करून यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली.