आभाळमाया ग्रुप कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ माहीम, मुंबई यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम संपन्न

तब्बल १८०० वृक्षांची केली लागवड

चौके (प्रतिनिधी) : “वृक्ष लागवड करणे हा एक कार्यक्रम असतो परंतु आपण लावलेले वृक्ष जगवणे, वाढवणे, जोपासणे त्यांचा सांभाळ करणे हे संस्कार आहेत आणि आपण आपले संस्कार नेहमीच जपतो. म्हणूनच आज लावलेली झाडे जगवण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एक झाड तोडलं तर त्या बदल्यात १० झाडं लावलीच पाहिजेत तरच निसर्ग जपला जाईल. आभाळमाया ग्रुपने एक आदर्शवत उपक्रम राबवून एक आगळा वेगळा पायंडा समाजासमोर घातला आहे. “असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ माहीम, मुंबईच्या सदस्या रश्मी पाटील यांनी वराडकर हायस्कुल कट्टा येथे वृक्षारोपण कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी केले. आभाळमाया ग्रुप कट्टा आणि रोटरी क्लब ऑफ माहीम, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 20 जून रोजी सावरवाड, वराड, तिरवडे, नांदोस, कट्टा, गुरामवाड या परिसरात ठीकठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबाविण्यात आली. या मोहिमेमध्ये अनेक मान्यवर, आभाळमाया ग्रुपचे शेकडो सदस्य, आणि स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

या दरम्यान वराडकर हायस्कुल कट्टा येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जि. प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, रोटरी क्लब ऑफ माहीमच्या सदस्या रश्मी पाटील, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनिल नाईक, संचालक बापू वराडकर, श्याम पावसकर, उद्योजक बिजेंद्र गावडे, संजय गावडे, विनोद सांडव, कट्टा सरपंच शेखर पेणकर, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे, रानी डगरे, तिरवडे सरपंच सुशील गावडे, वराड सरपंच सौ. शलाका रावले, सामाजिक कार्यकर्ते जे. बी. परब, डॉ. सोमनाथ परब, डॉ. प्रथमेश वालावलकर, डॉ. रोहित डगरे, स्मिता कॉम्प्युटर च्या संचालिका श्रद्धा नाईक, वराडकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, ऍड. प्रदिप मीठबावकर, प्रविण मीठबावकर, समीर रावले, गौरव हिर्लेकर, अमित चव्हाण, युवराज ढोलम, ज्ञानेश्वर चव्हाण, किरण रावले, अजय चव्हाण, गणेश पार्टे, दादा वराडकर, गणेश मोरजकर, महेश यादव, छोटू ढोलम, विवेक सावंत, आप्पा फाटक, सिद्धू पेनकर, अक्षय गावडे, तेजस म्हाडगुत, दादासाहेब वराडकर कॉलेजचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, इंग्लिश मिडीयम स्कुलचे ऋषी नाईक आणि सर्व शिक्षक आणि आभाळमाया ग्रुपचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन संजय पेंडूरकर यांनी केले.

यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांना आभाळमाया ग्रुपतर्फे वृक्ष देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच वराडकर हायस्कुल मधील सर्व विद्यार्थ्यांना आभाळमाया ग्रुप आणि रोटरी क्लब माहीम तर्फे मोफत वृक्ष वाटप करण्यात आले व “एक पेड माँ के नाम” या अंतर्गत वृक्ष लागवड करून त्याची जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर वराडकर हायस्कुल कट्टाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सध्याचे वाढते तापमान आणि पर्यावरणातील चिंताजनक बदलामुळे वृक्ष लागवड करून ते जगवणे ही काळाची गरज ओळखून विक्रमी रक्तदान शिबिरांच्या यशस्वीतेनंतर वसुंधरेचे जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी सामाजिक कार्यातील अग्रगण्य ग्रुप आभाळमाया ग्रुपने आज भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून आणखी एक नवीन वाटचाल सुरु केली. त्याला रोटरी क्लब ऑफ मुंबई माहीम यांची बहुमोल साथ लाभली. या वृक्षारोपण मोहिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त वृक्ष लागवड करून सोडून न देता ते जगवण्याची त्यांना वाढवण्याची जबाबदारी त्या त्या परिसरातील आभाळमाया ग्रुपच्या सदस्यांनी घेतली आहे. त्यामुळे आभाळमाया ग्रुपच्या या उपक्रमाचे समाजात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!