कोल्हापूर सहकाराची पंढरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अध्यात्मिक व सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. या परिसराचा विकास करण्याचा आग्रह केंद्रीय गृहमंत्र्यांनी आग्रह धरला होता. राज्यातील 5 जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचाही विकास सुरु आहे. भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील शंभर वर्षात सेवा करता येईल असे व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. कोल्हापूर शहर हे केवळ शक्तिपीठ अथवा अध्यात्माची पंढरी नाही तर ती सहकाराची आद्य पंढरी असल्याचे सांगितले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कणखर नेतृत्वात देशाची वेगळी ओळख निर्माण झाली असून त्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याचे गौरोवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

error: Content is protected !!