कोकिसरे जिल्हा परिषद, वैभववाडी तालुका शिक्षण संस्था व पतंजली योग समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज वैभववाडीत कोकिसरे जिल्हा परिषद, वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई व पतंजली योग समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शिक्षक विजय मरळकर, संदेश तुळसणकर, संगिता पाटील यांच्यासह योग समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर केली. वंदे मातरम् गिताने योग शिबीराची सांगता करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक रोहन रावराणे व जिल्हा परिषद सदस्या श्रावणी रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थित शुभेच्छा व्यक्त केल्या. पालकमंत्री नितेश राणे यांना दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना यावेळी उपस्थितांकडून करण्यात आली. नंतर उपस्थित इयत्ता सहावी च्या विद्यार्थ्यांना बदलत्या अभ्यासक्रमाची पुस्तके व पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना देखील पाठ्यपुस्तके व खाऊ चे वाटप उपस्थित संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक विजय रावराणे, मुख्याध्यापक भास्कर नादकर,वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, माता पालक संघाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, पतंजली योग समिती वैभववाडी चे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी -पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













