घोरण्याच्या समस्येवर डेरवण रुग्णालयात निदान व उपचाराचे शिबीर

७ ते २१ जुलै दरम्यान शिबिराचे आयोजन ; नावनोंदणी आवश्यक

चिपळूण (प्रतिनिधी) : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे असणार आहे.

या शिबिरामध्ये घोरणाऱ्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरात स्लिप स्टडी करण्यात येणार आहे. ज्यामुळे पेशंटला घोरण्याचा त्रास कशामुळे आहे. याचे निदान होईल. दररोज एक अशा प्रकारे पंधरा दिवसात पंधरा स्लिप स्टडी करण्याचा मानस इ. एन. टी. सर्जन डॉ. प्रतीक शहाणे यांचा आहे. या शिबिरासाठी पेशंटची नाव नोंदणी उद्या २० जुन पासून वालावलकर रुग्णालयात सुरू होणार आहे. “घोरणे ही केवळ एक समस्या नसून तो एक आजार आहे. आणि या आजारामुळेच बीपी, शुगर, हार्ट अटॅक अशा आजारांना आमंत्रण मिळते, हे लक्षात घेऊन लोकांची जनजागृती करण्यासाठी व गरीब रुग्णांसाठी वालावलकर रुग्णालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जर तुम्हाला रात्री घोरणे, सकाळी उठल्यावर फ्रेश न वाटणे, दिवसभर सतत झोप येणे, गाडी चालवताना झोप येणे, रात्री झोपेत गुदमरल्यासारखे वाटणे, नैराश्य, कोणत्याही कामात उत्साह न वाटणे अशा समस्या असतील तर ही सर्व लक्षणे स्लिप apnea ची आहेत. त्वरित स्लिप स्टडी करणे गरजेचे आहे. वरील लक्षणे असणाऱ्यांसाठी हे शिबिर वरदान ठरणार आहे.” अशी माहिती वालावलकर रुग्णालयाच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. सौ. सुवर्णा पाटील यांनी दिली. नावनोंदणी साठी डॉ. प्रतिक शहाणे 86005 91639 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!